रियाज खान यांच्या समवेत ५६ कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
बांदा : प्रतिनिधी
बांदा शहरात शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उबाठा सेनेला जोरदार धक्का दिला आहे. युवा सेना उपतालुकाप्रमुख रियाज खान यांच्यासह सुमारे ५६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला. जिल्हाप्रमुख संजू परब व महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत – कविटकर यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेट्स फर्नांडिस, बांदा विभागप्रमुख राजेश विरनोडकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, भैया गोवेकर, तालुका संघटक गुरुनाथ सावंत, राकेश पवार, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, प्रशांत जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी युवा शहर प्रमुख सागर धोत्रे, विद्यार्थी सेनेचे साहिल खोबरेकर, उपविभाग प्रमुख दत्ताराम बांदेकर, अल्पसंख्याक महिला उपतालुका प्रमुख बिस्मिल्ला खान, श्रीकांत धोत्रे, राजा खान, परशुराम धोत्रे, अक्षर खान, राहुल माने, फरबेज आगा, हेमंत गावडे, संजय गावडे, आशपाक आगा, बाबा धुरी, राजन धुरी, रुपेश बांदेकर, सागर नाईक, श्रीकांत नाईक, शुभम गावडे, महादेव सुभेदार, रुपेश मळेवाडकर, बालाजी जाधव, वनिता धोत्रे, गौरी तारी, फरजान शेख, लक्ष्मी गाडेकर आदींसह ५६ कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उबाठा सेनेत प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नाही. जिल्हा, तालुका स्तरावरील नेते केवळ निवडणुकी वेळी दिसतात. कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून कामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी रियाज खान यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रुपेश पाटील यांनी केले.
शिवसेना बांदा शहर प्रमुख पदी ज्ञानेश्वर सावंत
यावेळी संजू परब यांनी शिवसेना बांदा शहर प्रमुखपदी निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत यांची निवड जाहीर केली. पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थ ठरवून वरिष्ठांना अभिप्रेत असलेले काम प्रामाणिकपणे करणार, असा विश्वास ज्ञानेश्वर सावंत यांनी दिला.












