नेमळे कौल फॅक्टरीचे कर्मचारी कमलाकर घोगळे यांचे निधन

नेमळे :नेमळे कुंभारवाडी येथील रहिवासी कमलाकर साबाजी घोगळे (वय ६२, मूळ रा. परमे, ता. दोडामार्ग) यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कै. कमलाकर घोगळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि मेहनती व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांचे मूळ गाव दोडामार्ग तालुक्यातील परमे हे असले तरी ते अनेक वर्षांपासून नेमळे येथे वास्तव्यास होते. त्यांनी नेमळे कौल फॅक्टरीमध्ये माल वाहतूक गाडीवर चालक म्हणून तब्बल तीस वर्षे सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातू आणि विवाहित मुलगी असा मोठा परिवार आहे.