रेंबवली महालक्ष्मी मंदिरात १ नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह

यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिरगाव (प्रतिनिधी)     देवगड तालुक्यातील रेंबवली गावचे जागृत ग्रामदैवत श्री देवी महालक्ष्मी यांच्या मंदिरात दिनांक १ नोव्हेंबर रोजी सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यादिवशी सकाळी १० वाजता घटस्थापना, ११ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता स्थानिक सुस्वर भजने, दुपारी ३ वाजल्यापासून ग्रामस्थ व पाहुणे मंडळींनी ओटी भरणे, नवस फेडणे व नवीन नवस बोलणे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ४.३० वाजेपर्यंत बाहेरील ग्रामस्थांच्या दिंडी भजन कार्यक्रम होणार आहे.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता काकड आरती, ५.३० वाजता प्रसाद वाटप, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, व दुपारी २ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या हरिनाम सप्ताहास भाविकांनी व भजनी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम साप्ताहची शोभा वाढवावी, असे आवाहन रेंबवली ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.