आगामी निवडणुकांच्या तोंडावर गुहागर मनसेत जोरदार इनकमिंग !

आबलोली वार्ताहर :
गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडी येथील महिला पुरुष यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली वडद सुतारवाडी येथील 50 महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सुतारवाडी येथील सभागृहात पार पडला.आगामी जि. प. व पं. स. निवडणुकांच्या तोंडावर मनसेने पक्षप्रवेशाचा धमाका केला आहे.
यावेळी मनसे वडद शाखेच्या अध्यक्षपदी प्राणेश पिंपळकर यांची तर राजेंद्र पिंपळकर यांची उपशाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या दोघांनाही प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, सुजित गांधी सुशांत कोळंबेकर आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजय पिंपळकर दत्ताराम पिंपळकर प्रसाद पिंपळकर उमेश पिंपळकर अजित पिंपळकर प्रमोद पिंपळकर अशोक पिंपळकर उमेश पिंपळकर, वासुदेव पिंपळकर वासुदेव, सचिन पिंपळकर दीपक पिंपळकर योगेश पिंपळकर मानसी पिंपळकर भाग्यश्री पिंपळकर रेखा पिंपळकर कल्पना पिंपळकर आरोही पिंपळकर आदी.ग्रामस्थ महिला – पुरुष बहूसंख्येने उपस्थित होते.