मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री सरस्वती साईश्वरी संस्था मुंबई तर्फे नाशिक येथे दिवाळी फराळ आणि भेटवस्तू वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वतीने तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असतो.
पद्मश्री सिंधू ताईच्या कार्याच्या प्रेरनेतून
दीपावली सणाचे औचित्य साधत पहिला उपक्रम सिंधुताई च्या आश्रमात दीपावली फराळ वाटप करण्यात आले. कांजूरमार्ग मुंबई येथील स्वच्छता कामगारांस मिठाई वाटप करण्यात आले.
तर तिसरा उपक्रम नाशिक इगतपुरीतील पिंपळगाव येथे गरजू गरिबांसाठी फराळ, कपडे, खेळणी,अन्न धान्य वाटप करून खऱ्या अर्थाने
चेहऱ्यावर हास्य दिसावे हेतूने प्रामाणिक प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूरज बांदकर यांनी दिली.
सदर उपक्रमाचे 12 वे वर्ष असून प्रमोद कांडरकर ,दत्तात्रेय पडवळ , सचिन पवार , नरेश करलकर , संस्थापक सुरज बांदकर उपस्थित होते.
लाभार्थींनी आभार व्यक्त करत संस्थेच्या पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या.












