हेरवाड येथील जुगार अड्ड्यावर छापा

एक लाख २२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिरोळ पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील पाच मैल रस्त्यावरील घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने छापा टाकत बारा जणांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान ९१९० रुपये रोख रक्कम ५३ हजार ५०० रुपये किंमतीचे १० मोबाईल हँडसेट आणि आणि ६० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार,आप्पा लक्ष्मण धामणे,गौतम विजय शिंगे (२९) , अमित पांडुरंग शिरोळे,अर्जुन लग्नाम्मा पुजारी (४५),रावसाहेब पाटील (३५) ,तानाजी लक्ष्मण कुन्नुरे (५०) ,सुदाम जनार्दन जाधव (७०),धनंजय नागेश कांबळे (५३),प्रकाश गजानन गवंडी (५२) रा.मजरेवाडी (ता.शिरोळ) अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने शनिवारी रात्री कुमार पाटील यांच्या घरावर छापा टाकला प्राथमिक चौकशीत अमित शिरोळे हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली.पुढील तपास शिरोळ पोलिस करत आहेत.