राजापूर प्रतिनिधी शहर बाजारपेठेतील विष्णूपंचायतन असलेल्या ऐतिहासीक श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात रविवारी कार्तिकी एकादशी उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि परिसरातील भाविकांनी विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी राजापूर शहरातील सुवर्णकार आनंद मालपेकर यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली. त्यानंतर अभिषेक, काकड आरती झाली. त्यानंतर दिवसभर भाविकांनी श्री विट्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर श्री विठ्ठल मंदिर ते अर्जुना नदीपात्रातील पुंडलीक मंदिर अशी दिंडी काढण्यात आली. ही दिंडी शिवाजीपथ मार्गे जवाहरचौक व पुन्हा विठ्ठल मंदिर अशी दिंडी काढण्यात येऊन सांयकाळी आरतीने उत्सवाची सांगता झाली. भक्त वत्सल भक्तीभाव मंडळाचे वतीने या उत्वाचे नियोजन आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोठया प्रमाणावर भाविक उपस्थित होते.













