माडखोल ग्रामपंचायतीतील उबाठा गटाचे तीन विद्यमान सदस्य भाजपमध्ये दाखल

भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते पक्ष प्रवेश 

सावंतवाडी । प्रतिनिधी : माडखोल ग्रामपंचायतीचे तीन विद्यमान सदस्य आणि दोन माजी पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अर्थात उबाठा गटातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ग्रामपंचायत माडखोलच्या राजकीय गणितात मोठा बदल झाला असून उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. सरिता बाळकृष्ण राऊळ,

सौ. दिप्ती दिपक राऊळ,

सौ. प्रज्ञा उल्हास राणे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य आणि

विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक आत्माराम शांताराम लातये व माजी ग्रामपंचायत सदस्य

उल्हास राणे या प्रमुख सदस्यांनी भाजपच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून तसेच स्थानिक नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली विकासाची कामे अधिक प्रभावीपणे करता येतील या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते तर भाजपचे मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, अशोक माळकर, आणि यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी माडखोलचे माजी सरपंच राजन राऊळ, बाळु शिरसाट, अनिता अनिल राऊळ, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाउ कोळमेकर, कैलास ठाकुर, तसेच माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, अनिल परब, बुध अध्यक्ष संतोष तेली, शैलेश राऊळ, सिद्धेश शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर, विष्णू राऊळ, आणि विकास म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

एकाच वेळी ग्रामपंचायतीचे तीन विद्यमान सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे माडखोल ग्रामपंचायतीमधील उबाठा गटाची ताकद कमी झाली असून, भाजपचे स्थानिक बळ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. भाजप नेत्यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले असून त्यांच्या माध्यमातून माडखोलच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.