नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

आजपासून आचारसंहिता लागू; २ डिसेंबर रोजी मतदान, ३ डिसेंबरला निकाल
​मुंबई : राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर झाला असून, यामध्ये २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज, ४ नोव्हेंबरपासून, या भागांमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी आणि निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होईल.
​राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगर पंचायती, ३३६ पंचायत समिती आणि २४६ नगरपालिकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.
*निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक*
​या निवडणुकांसाठी आयोगाने खालीलप्रमाणे तपशीलवार वेळापत्रक (टाईमटेबल) जाहीर केले आहे:
​नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्यास सुरुवात: १० नोव्हेंबर २०२५
​नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर २०२५
​अर्जांची छाननी: १८ नोव्हेंबर २०२५
​अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख: २१ नोव्हेंबर २०२५
​निवडणूक चिन्हांचे वाटप: २६ नोव्हेंबर २०२५
​मतदान: २ डिसेंबर २०२५
​निकाल: ३ डिसेंबर २०२५

मतदार संख्या आणि तयारी
​या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीनुसार, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी राज्यात एकूण १३ हजार कन्ट्रोल युनिट (Control Units) स्थापन करण्यात आले आहेत.