सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक म्हणून श्री. दिपक घोडे यांची नियुक्ती

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकपदाची जबाबदारी श्री. दिपक घोडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे दीपक घोडे यांनी आज सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेतली.

जनतेला एसटीच्या सक्षम सुविधा पुरवा अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिल्या.

श्री. घोडे यांनी यापूर्वी विविध विभागांत उल्लेखनीय सेवा बजावली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा सिंधुदुर्ग विभागाला होणार आहे.