आबंडोस ग्रामदैवत रवळनाथ देवाचा उद्या जत्रोत्सव

चौके – प्रतिनिधी :-मालवण तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोस्तव उद्या गुरुवार दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे.

या निमित्ताने सकाळी नेहमीप्रमाणे देवांची पूजाअर्चा केली जाते. विठ्ठला देवीकडे माहेरवाशीने तसेच भाविक भक्तांकडून ओट्या भरल्या जातात. तर रवळनाथ देवाला नारळ आणि केळी यांचा नैवेद्य दाखवला जातो. रात्रौ उशिरा मंदिराभोवती मंदिराभोवती पालखी प्रदर्शना झाल्यानंतर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग सादर केला जातो दुसऱ्या दिवशी घाडगे फोडून जत्रोत्सवाची सांगता होते.तरी भाविक भक्तांनी या उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव रवळनाथ मानकरी यांच्याकडून करण्यात आले आहे