वेंगुर्ले येथे माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांचा शिवसेने मध्ये प्रवेश

आम. दीपक केसरकर यांच्यासह जिल्हप्रमुखांची उपस्थिती

वेंगुर्ले : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आज वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेने मध्ये प्रवेश केला. दरम्यान एक सच्चा समाजसेवा करणारा कार्यकर्ता पिंटू च्या रूपाने शिवेनेला मिळाला आहे. त्यामुळे अशा युवा शक्ती मुळे वेंगुर्ले नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

वेंगुर्ले शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर यांच्या सह जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहर प्रमुख उमेश येरम, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोस्टल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, महिला तालुकाप्रमुख शितल साळगावकर, शहर प्रमुख ॲड श्रद्धा बाविसकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शहर प्रमुख सागर गावडे, परिक्षीत मांजरेकर, सुहास कोळसुलकर, माजी नगरसेवक मोहन गावडे, आदित्य खानोलकर, शबाना शेख, मनाली परब यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन वालावलकर यांनी प्रस्ताविक करताना पक्षाची भूमिका उपस्थितांसमोर मांडली. शासनाच्या माध्यमातून शहरात केलेल्या विविध योजना कशा राबविल्या त्यासाठी किती निधी आणला याबाबत सविस्तर माहिती दिली. खड्डेमय रस्ते डांबरयुक्त करण्यासाठी कामे मजूर असून पाऊस असल्याने ती रखडलेली आहेत. ती कामेही पूर्ण होतील. आम्ही चांगली कामे करत आहोत त्यामुळेच आज शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहेत. दरम्यान आपला शिवसेना पक्ष वाढविण्याची आता संधी आपल्यावर आहे.ती आपण पूर्णपणे झोकून देऊन करूया असे आवाहन त्यांनी केले.

वेंगुर्ले नगराध्यक्ष यांच्या सह सर्व नगरसेवक आपलेच असतील : जिल्हाप्रमुख संजू परब
पिंटू गावडे एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्यांची शहरात किती ताकद आहे हे त्यांच्या सोबत होत असलेल्या भव्य पक्ष प्रवेशा वरून दिसून येते असे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले.

शहर प्रमुख उमेश येरम यांनी आपल्या मनोगतामध्ये वेंगुर्ले शहरात नगराध्यक्ष आणि सत्ता शिवसेनेचीच असेल आणि नगरपरिषदेवर भगवा आमचाच फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.