दुचाकीची पादचाऱ्यास धडक; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे दुचाकी चालवून पाचदाऱ्यास धडक देत अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 5 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वा.सुमारास कोकणनगर ते चर्मालय जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
सफवान जिकिर बोरकर (26,रा.कोकणनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या अपघातात रामनिहोर छोटेलाल पटेल (40,मुळ रा.रायपूर,मध्यप्रदेश सध्या रा.चर्मालय,रत्नागिरी) हा पादचारी जखमी झाला असून महिला पोलिस हेड काँस्टेबल अमिता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,बुधवारी रात्री सफवान बोरकर आपल्या ताब्यातील बुलेट (एमएच-08-बीडी-4706) घेउन भरधाव वेगाने मजगाव रस्त्याने चर्मालय ते कोकणनगर असा जात होता. तो चर्मालय नाका येथे आला असता त्याच्या दुचाकीची धडक रामनिहोर पटेलला बसून हा अपघात झाला. यात दोघांनाही दुखापती झाल्या असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.