एलसीबी ची धडक कारवाई
बांदा : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा बनावटीची अवैध दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन आरोपींना अटक केली आहे. आज पहाटे ३.३० वाजता हॉटेल कावेरी समोर ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई – गोवा बायपासवर बांद्याच्या दिशेने येणारी इनोव्हा कार तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला. दारूची किंमत २ लाख ११ हजार २०० रुपये असून १० लाख रुपयांची कार असा एकूण १२ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आकाश नामदेव खोत (वय २५, रा. सलगरे, जि. सांगली) व विठ्ठल पांडुरंग नाईक (वय ४८, रा. विश्रामबाग, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













