कसबा दख्खनी मोहल्ला येथे गांजा सेवन करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल;

 ₹२०१ चा मुद्देमाल जप्त

​संगमेश्वर: ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कसबा दख्खनी मोहल्ला, शास्त्री नदी किनारी असलेल्या एका मोडकळीस आलेल्या शेडमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि बाळगल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे इम्रान अहमद वागळे, आतिक सिदधीक शहा, आणि तुषार प्रभाकर विचारे अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही त्या शेडमध्ये गांजाचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ₹२०१ किमतीचा गांजा आणि संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी, संगमेश्वर पोलीस ठाण्यात ९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.३१ वाजता तिन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.