कलमठ ग्रा. पं.मध्य उद्योजकता विकास प्रशिक्षण
कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीतर्फे महिलांसाठी महिला स्नेही गाव संकल्प राबवत आहे. जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉन सिंधुदुर्गतर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण राबवत आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना बेकरी उत्पादन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिला उद्योजक तयार होतील, असा विश्वास कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केला.
जिल्हा उद्योग केंद्र, मिटकॉन सिंधुदुर्ग आणि कलमठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण’कलमठ ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात बेकरी उत्पादन पदार्थ प्रशिक्षण कार्यक्रमसाठी प्रशिक्षणार्थी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
सदर मुलाखती जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांच्या मार्फत झाले. प्रशिक्षण शिबिरामध्ये ३० महिलांची तुकडी केली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र व १००० जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळणार आहे. जिल्हा उद्योक केंद्राच्या विविध योजनांची माहिती जिल्हा उद्योग निरीक्षक कोमल माने यांनी केले. एक महिन्याच्या या शिबिराला गावातील ३० महिलांची निवड झाली आहे.
यावेळी मिटकॉन जिल्हा समन्वयक जितेंद्र चिकोडी, ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, तन्वीर शिरगावकर उपस्थित होत्या. कलमठ गावाची या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल मेस्त्री यांनी आभार मानले.













