रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत, आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ दोन नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही अर्ज एकाच प्रभागातून आणि एकाच कुटुंबातील उमेदवारांनी दाखल केले आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. बावानी मतीन याकुबसत्तार प्रभाग क्र ३ ब : सर्वसाधारण |
२. बावानी हीना मतीन – प्रभाग क्र. ३ ब सर्वसाधारण













