जांभवडे गावासाठी मा. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर 

सरपंच अमित भालचंद्र मडव यांनी मानले आभार 

कुडाळ:-कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावासाठी सरपंच अमित मडव यांच्या यशस्वी पाठपुराव्याने मा. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 1 कोटीची विविध विकास कामे विविध योजनेतून मंजूर झाली आहेत.

जांभवडे ग्रामपंचायत सचिवालय बांधणे,जांभवडे कासारखिंड रस्ता दुरुस्ती करणे,जांभवडे भंडारवाडी – कुंभारवाडी स्ट्रीट लाईट करणे,जांभवडे वाघबीळ वाडी – रानेवाडी स्ट्रीट लाईट करणे,जांभवडे रानेवाडी रस्ता तयार करणे,जांभवडे गावनमाळा रस्ता तयार करणे,जांभवडे भूतवड सावंतवाडा स्ट्रीट लाईट करणे,

जांभवडे – भूतवड बामन वाडी रस्ता दुरुस्ती करणे,जांभवडे भूतवड चव्हाटेश्वर – नाईक वाडी रस्ता तयार करणे,जांभवडे भंडारवाडी येथे बंधारा बांधणे आदी विकास कामे गावात मंजूर करण्यात आली असून ह्या साठी सरपंच अमित मडव यांनी सतत पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले असून ही कामे लवकर पूर्ण होतील तसेच सरपंच यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला गेलेला जांभवडे भूतवड ग्रा. मा. 17 ह्या 5 की. मी.रस्त्या साठी आमदार साहेबांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती देण्यात आली तसेच जिल्हा प्रमुख मा. दत्ता सामंत, जिल्हा सचिव श्री. दादा साहिल, तालुका प्रमुख श्री. विनायक राणे, विभाग प्रमुख श्री. विठ्ठल तेली प. स. सदस्य श्री. बाळकृष्ण मडव यांचेही सहकार्या बद्धल आभार मानत सरपंच अमित मडव यांनी मा. आमदार निलेशजी राणे साहेब यांना अभिप्रेत असलेले काम व संघटनावाढीचे काम आपण करत राहू असे सांगून निलेशजी राणे यांचे आभार व्यक्त केले