वेंगुर्ले l प्रतिनिधी :सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून, गरजू रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस आणि भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग ३४ वे रक्तदान शिबिर असून, संस्थेने गेल्या काही वर्षांत शेकडो रक्तदात्यांना प्रोत्साहन देत “रक्तदान – महादान” ही संकल्पना समाजात रुजवली आहे.
दरम्यान हे शिबिर शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता
श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे, तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई यांच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे. या जनहिताच्या उपक्रमात वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विवेक तिरोडकर आणि भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला चे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रक्तदात्यांनी नावनोंदणीसाठी श्री. महेश राऊळ : ९४०५९३३९१२ किंवा डॉ.सचिन परुळकर : ९४२१२३८०५३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











