रिगल कॉलेज शृंगारतळी येथे वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

गुहागर | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कोकण विभागीय मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज ‌श्रृंगारतळी आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन गटांमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यामधील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अमीष कदम (सर्वेसर्वा, सद्गुरू मोटर ट्रेनिंग स्कूल, श्रृंगारतळी) आणि सौ. सोनाली आहिरराव (सहाय्यक प्राध्यापिका, कनिष्ठ महाविद्यालय, अंजनवेल) उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये प्रथम उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकेमध्ये रिगल कॉलेज, श्रृंगारतळीच्या प्राचार्या मोरे मॅडम यांनी रिगल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच आपल्या प्रास्ताविकेमध्ये बोलताना त्यापुढे म्हणाल्या की वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे सादरीकरण कौशल्ये सुधारते, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळते, उच्चार विकसित होतात तसेच आत्मविश्वास निर्माण होतो, या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले.
मा. अमिष कदम यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की रिगल कॉलेज नेहमीच अशा निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करत असते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या गुणांचा विकास होण्यास मदत होते तसेच या कार्यक्रमानिमित्त त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सौ अहिरराव मॅडम यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषणांचे सादरीकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कु. दीक्षा दीपक भोसले (सरस्वती विद्यामंदिर, जामसुत), कु. आर्या प्रशांत साळवी (काजुर्ली हायस्कूल), कु. रेईशा वीरेंद्र चौगुले (श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर) यांना मिळाला. उत्तेजनार्थ पारितोषिक पायल प्रशांत साळवी (काजुर्ली हायस्कूल) हिला मिळाले. उच्च माध्यमिक गटामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे कु. प्रगती पद्मनाभ जोशी (पालशेत कॉलेज, पालशेत) आणि राज वसंत तावडे जूनियर कॉलेज, गुहागर) यांना मिळाला.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षिसांचे स्वरूप रोख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या मोरे मॅडम यांच्या मर्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.