अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेंगुर्ले न. प. निवडणुकीत नगरसेवक पदासाठी तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल

वेंगुर्ले l दाजी नाईक :अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीत तीन जागांवर नगरसेवक पदासाठी उमेदवार देण्यात आले. यामध्ये प्रभाग १ मधून ॲड. मनीष सातार्डेकर, प्रभाग ७ मधून ॲड. जी जी टाककर आणि प्रभाग ९ मधून सचिन वराडकर यांचा समावेश आहे.

वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयातील निवडणूक कक्षात या तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सचिव एम. के. गावडे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, शहर अध्यक्ष सुरज परब, जिल्हा सचिव सुशील चमणकर, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, युवक अध्यक्ष गजानन कुंभार, युवती अध्यक्ष निधी शिरोडकर, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर व कार्यकर्ते अनंत पाटकर, संजय वराडकर, सौ.निलिमा वराडकर, योगेश्वर वेंगुर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.