विवाहिता आत्महत्या प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

मालवण शहर देऊळवाडा येथील घटना

मालवण | प्रतिनिधी :मालवण शहर देऊळवाडा येथील विवाहिता रेश्मा प्रमोद गावकर (वय- ४२) या विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा प्रमोद दिगंबर गावकर (वय- ४५) याच्या विरोधात प्राप्त तक्रारी नुसार मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रेश्मा हिचा भाऊ दिलीप रमेश कोरगावकर (तळवडे म्हाळाईवाडी, ता. सावंतवाडी) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने करत आहेत.