माखजन हायस्कुल च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल,व ॲड.पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.शालेय क्रीडा स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सांगली येथे झालेल्या विभागीय स्क्वॉश स्पर्धेत तन्वी सुभाष पकडे (१२ वी विज्ञान)हिने १९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला.व बुशरा साबीर अली कापडी (१० वी) हिने १७ वर्षाखालील गटात स्क्वॉश खेळात द्वितीय क्रमांक मिळवला.या दोघींची पुणे येथे होणाऱ्या राज्यसतरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
तर सातारा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत सॉफ्ट टेनिस खेळात श्रेया मंगेश फणसे हिने पाचवा क्रमांक मिळवला.हिला बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक क्रांती म्हसकर,प्रा अभिजित सुर्वे,निखिल वारके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष किशोर साठे,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.