वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आता रंगत वाढत आहे. प्रभाग क्रमांक ४ ब मधील अपक्ष उमेदवार श्री. नामदेव प्रकाश वारंग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या प्रभागात पाच उमेदवार राहिले आहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या २१ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यानंतरच उमेदवारांचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अजून किती उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात ते उद्या संध्याकाळी स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीच्या रिंगणात भाजपा, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिले असून सर्वजण आपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयासाठी घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत.












