परब मराठा समाजाच्या वतीने अदिती परब हिचा सत्कार!

 मसुरे | झुंजार पेडणेकर
बालदिनानिमित्त परब मराठा समाजातर्फे बालदिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुंबईची अदिती परब हिने आयटीसी फॉर्च्युन हॉटेल, वाशी येथे झालेल्या ‘टी आय जी पी’ राष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत ‘टी आय जी पी’ मिस इंडिया २०२५ हा मानाचा किताब तसेच ग्लॅमरस फेस हा विशेष मान पटकावून झळाळते यश संपादन केल्या बद्दल परब मराठा समाजातर्फे अदितीचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरचिटणीस जी. एस. परब, सुनील परब आणि प्रकाश परब हे मान्यवर उपस्थित होते.