माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात माजी विद्यार्थ्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेत शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात येणार आहे.१९१८ साली स्थापन झालेल्या या शाळेने रौप्य,सुवर्ण,हिरक,अमृत,शताब्दी असे अनेक महोत्सव माजी विद्यार्थी,हितचिंतकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरे केले आहेत.या शाळेला माजी विद्यार्थ्यांच्या रूपात मोठी संपत्ती आहे.अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत.या साऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येणार आहे.
२५ रोजी होणाऱ्या सभेला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक महादेव परब यांनी केले आहे.









