मसुरे | झुंजार पेडणेकर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे देव दिवाळीपासून (21 नोव्हेंबर) जत्रोत्सवाच्या दिवसापर्यंत भाविकांच्या ओट्या भरण्याचा विधी प्रति वर्षी प्रमाणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये भाविकांच्या ओट्या देवालयात भरल्या जाणार नाहीत. भाविकांना देवीचे दर्शन नियमित वेळेनुसार मिळेल. वार्षिक जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसून सोशल मीडिया वरती जत्रा तारखे बाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. तारीख निश्चित झाल्यानंतर अधिकृतरित्या आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने कळविण्यात येईल. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.













