कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचार फेरीला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरसेवक पदाच्या उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार फेरी कणकवली शहरात काढण्यात आली.
भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने प्रचारफेरीला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. मागील कार्यकाळात माजी नगरसेवक अॅड. विराज भोसले यांच्या माध्यमातून प्रभागात विविध विकासकामे राबविण्यात आली. या विकासकामांमुळे नागरिकांचा पाठिंबा अधिक दृढ झाल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कामगिरीच्या जोरावर “प्रभाग क्रमांक ११ मध्ये विक्रमी मताधिक्य मिळेल आणि नगराध्यक्ष पदासाठी मी तर नगरसेवक पदासाठी मयुरी चव्हाण निश्चित विजयी होऊ,” असा ठाम विश्वास माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केला.
प्रचारफेरीत नगरसेवक पदाच्या उमेदवार मयुरी चव्हाण, अॅड. विराज भोसले, आशिये सरपंच, महेश गुरव, राजू गवाणकर, राजा पाटकर, निखिल आचरेकर, चिराग वैशिवडे, हर्षद मुसळे, पंकज आजगावकर, सुप्रिया पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













