जनशिक्षण संस्थान–सिंधुदुर्ग व शिरगाव हायस्कूलचा संयुक्त पुढाकार
शिरगाव (प्रतिनिधी) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग आणि शिरगाव हायस्कूल व जुनिअर कॉलेज, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन ज्वेलरी प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम शिरगाव हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे संचालक श्री. सुधीर पालव यांनी स्वतःची प्रगती साधणे ही काळाची गरज असून, बदलत्या युगात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कौशल्यवृद्धी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन केले.
प्रशिक्षण म्हणजे व्यक्तीमध्ये विशिष्ट कौशल्ये, ज्ञान आणि क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया असून ते व्यवसाय, कला आणि उपजीविकेसाठी उपयुक्त ठरते,” असे मार्गदर्शन शाळा समितीचे चेअरमन श्री. विजय कदम यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रा. श्री. सागर करडे यांनी केले. कौशल्याधारित प्रशिक्षणाचा योग्य उपयोग केल्यास आर्थिक उन्नती साधता येते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या क्षेत्रात शिकण्याच्या आणि प्रगतीच्या असंख्य संधी असून, त्याचा योग्य उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवता येईल, असे सांगून कार्यक्रम अधिकारी सौ. चैत्राली शिर्के यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक श्री. सुधीर पालव, शाळा समितीचे चेअरमन श्री. विजय कदम, प्राचार्य श्री. शाम्शुधीन अत्तार, कार्यक्रम अधिकारी सौ. चैत्राली शिर्के, प्रा. श्री. सागर करडे, श्री. योगेश पाताडे, प्रशिक्षिका सौ. प्रभा माईनकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.












