वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप गिरप यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्यासह सौ. नीलमताई राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री
ना. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे यांनी दिलीप गिरप यांच्याशी निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा केली. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.












