या अवैध धंद्यातून येणारा पैसा जिहादी कारवाया करण्यासाठी वापरला जातो
नायझेरियन प्रमाणेच रोहिंग्या आणि बांगलादेशी वर कारवाई करनार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
संतोष राऊळ ( विधान भवन ) महाराष्ट्र राज्यात नायझेरियन नागरिकांकडून घुसखोरी करत ड्रग्स विकला जातो आणि इतर सुद्धा अवैधधंदे केले जातात. त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याकडूनही ड्रग्स विक्री आणि अवैधधंदे केले जातात. या व्यवसायातून येणारा पैसा जिहादी कारवाया करण्यासाठी वापरला जातो.देश विरोधी कारवाया करण्यासाठी वापरला जातो.महाराष्ट्रात या सुरू असलेल्या प्रकाराला आळा घाला. त्यांच्यावर कारवाई केली जावी. बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना डिटेंशन करा.अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी उत्तर देताना आपण नायझेरियन घुसखोर आणि अवैधधंदे करणारे,ड्रग्स विकणारे आहेत. त्यांच्यावर जशी कारवाई करतो आहोत तीच कारवाई बांगलादेशी आणि रोहिंग्यावर करत आहोत. कोणाकडे त्यांचे आधार कार्ड आणि तत्सम ओळखपत्र असेल तर त्याची पडताळणी करून बोगस आधार कार्ड असणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. बेकायदेशीर राहणाऱ्यांना स्थानबद्ध करण्यासाठी डिटेंशन सेंटर बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.












