देवबाग डिंगेवाडी श्री विश्वेश्वर जत्रोत्सव मंगळवार 2 डिसेंबर रोजी 

 

मालवण | प्रतिनिधी : देवबाग विश्वेश्वर मंदिर, डिंगेवाडी येथील वार्षिक जत्रोत्सव 2 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्या निमित्त सकाळी धार्मिक विधी, दर्शन, रात्रौ श्री. कलेश्वर नाट्यमंडळ नेरूर (भाई कलिंगण) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वेश्वर देवस्थान मंडळ, डिंगेवाडी यांनी केले आहे.