आचरा | अर्जुन बापर्डेकर : जनता विद्यामंदिर त्रिंबक या प्रशालेने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक परीक्षा 2023 मध्ये भरघोस यश संपादन केले आहे.
प्रशालेच्या इयत्ता पाचवीच्या दोन विद्यार्थिनी व इयत्ता आठवीची एक विद्यार्थिनी अशा एकुण तीन विद्यार्थिनींनी प्रशालेमधून यश संपादन केले.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे.. इयत्ता पाचवी – कुमारी प्राप्ती नागोराव वाघमारे (२३२ ) कुमारी तृप्ती नागोराव वाघमारे(२१८ ) त्याचप्रमाणे इयत्ता आठवी – कुमारी शर्वरी प्रशांत परब (१६०) यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष श्री सुरेंद्र सिताराम सकपाळ, उपाध्यक्ष श्री.अशोक रामचंद्र बागवे, सचिव श्री. अरविंद महादेव घाडी व सर्व संचालक, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रविण घाडी सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












