राजापूर शहरातील कोंडेतड भंडार वाडी येथील सुरेश शंकर दुधवडकर बेपत्ता

राजापूर | प्रतिनिधी:

राजापूर शहरातील कोंडेतड भंडार वाडी येथील रहिवासी सुरेश शंकर दुधवडकर वय ६५, हे सोमवार दुपार पासून नापत्ता असल्याची तक्रार पुतण्या ज्ञानेश्वर जयवंत दुधवडकर यांनी राजापूर पोलीस ठाणे येथे दिली आहे. सोमवारी दुपारी ११:३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान घरात कुणीही नसताना सुरेश दुधवडकर हे घरातून बाहेर पडले होते. मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे पुतण्या ज्ञानेश्वर याने पोलिसात ते नापत्त असल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नापत्ता म्हणून नोंद केली असून राजापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.