राजापुरातील फॅमिली बझारचे मालक महंमद हुसैन उर्फ भोलू काझी यांचा विवाह थाटात संपन्न

राजापूर : राजापूर शहरातील मे. ए. एच. काझी आणि कंपनीच्या प्रसिध्द फॅमिली बझारचे मालक पै. अ. सलाम युसुफ काझी यांचे ज्येष्ठ पुत्र महंमद हुसैन उर्फ भोलू काझी यांचा शुभविवाह शहरातील कोंढेतड येथील अल्ताफ अब्दुल लतिफ सारंग यांची कन्या कौसर हिच्या सोबत रविवारी शहरातील राजीव गांधी क्रिडांगणावर मोठा उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.

रविवारी सायंकाळी राजापूर शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर पार पडलेल्या या शानदार अशा विवाह सोहळयाला राजापूरचे आमदार किरण सामंत, माजी आमदार एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांसह राजापूर शहर परिसरातील व्यापारी, नागरिक, वकिलवर्ग, डॉक्टर, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, सांगली, पुणे परिसरातील अनेक व्यापारी, उद्योजक व मित्र परिवार, विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, धर्मगुरू, विविध शासकिय अधिकारी यांसह अनेकांनी उपस्थित रहात वधुवरांस शुभाशिर्वाद दिले. याप्रसंगी काझी यांचा मित्रपरिवारही मोठया संख्येने या विवाह सोहळयास उपस्थित होते.

याप्रसंगी काझी व सारंग परिवारातील सर्व सदस्यांकडून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.