फोंडाघाट हौशी क्रिकेट क्लब, फोंडाघाट ची स्थापना ! अध्यक्षपदी दिलीप इस्वलकर, सचिवपदी भरत मोरे आणि जयेश सावंत खजिनदारपदी एकमताने नियुक्त !

फोंडाघाट मधील क्रिकेटचा संस्मरणीय इतिहास उलगडणार —

फोंडाघाट| कुमार नाडकर्णी— एकेकाळी फोंडाघाट, किरमॅंगो स्टेडियम, येथे जिल्हा व बाहेरील संघामध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या मॅचचा आनंद फोंडाघाट वाशियांनी घेतला होता. अजित सामंत सारखा खेळाडू अशाच सरावातून राज्य पातळीवर घडला होता. गेले कित्येक दिवस फोंडाघाट मधील युवा क्रिकेटचा जुना इतिहास जागवण्यासासाठी, एकत्र येण्याच्या प्रयत्नात होते. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन आणि कणकवली तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारपेठेतील राधाकृष्ण मंदिरामध्ये (चाळीस वर्षावरील) क्रिकेट प्रेमींची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये फोंडाघाट हौशी क्रिकेट क्लब ची स्थापना करण्यात येऊन,दिलीप इस्वलकर अध्यक्ष, उमेश तळेकर उपाध्यक्ष, भरत मोरे सचिव आणि जयेश सावंत खजिनदार पदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. तसेच उमेश वंजारे, प्रकाश शेळके, राजेंद्र बागवे, प्रसाद (छोटू)) सावंत,अविन मरिये, विनायक कुबडे ,नरेश मांजरेकर, हरीश शितोळे, देवेंद्र कांबळी, संदीप (बाली) जोईल, गजानन (बंडू) सावंत, उदय ठाकूर, संदीप बागवे, संतोष पारकर, संजय सावंत, रवींद्र सोलकर, विजय लाड, विनोद सावंत यांची सदस्य पदी तर आनंद मरिये, संजय नेरुरकर,विश्वनाथ जाधव, भालचंद्र सावंत, महेश सावंत, वितू सावंत आणि संतोष टक्के यांची सल्लागारपदी एकमताने निवड करण्यात आली..

 

त्यामुळे लवकरच फोंडाघाट मधील मैदान, हौशी क्रिकेट खेळाडूंनी गजबजणार असून, लोकांना आनंद घेता येणार आहे….