वाडा-कसबेवाडी (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री साईनाथ मंदिराचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजता पाद्यपूजेने कार्यक्रमाची सुरुवात होईल, तर त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता काकड आरती आणि सकाळी आठ वाजता अभिषेकाचे आयोजन आहे. त्याचबरोबर सकाळी दहावाजता श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा संपन्न होणार असून दुपारी साडेबारा ते दोनदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी चार वाजता बुवा सौ. साची रूपेश मुळंम यांचे प्रासादिक भजन रंगणार असून त्यानंतर सायंकाळी स्थानिक कलाकारांच्या भजन आणि ढोलपथकाचा विशेष कार्यक्रम होईल. रात्री ठिक नऊ वाजता २०-२० भजनांचा जंगी सामना रंगणार असून यात श्री दुर्वास गुरव यांच्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाची आणि श्री गुंडू सावंत यांच्या हनुमान प्रासादिक भजन मंडळाची डबलबारी होणार आहे .
सदर कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांनी व भाविक भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सद्गगुरु साई चरण सेवा मंडळ, वाडा-कसबेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












