राजापूरात मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा

पहिल्या दोन तासात १४.२५ टक्के मतदान

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सकाळच्या सत्रात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात सरासरी १४.२५ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांनीही मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर हजेरी लावली होती.
सकाळी ९.३० वाजेपर्यंत ११६० मतदारांनी मतदानाचा हक्क् बजावला. यामध्ये ४४७ महिला तर ७१३ पुरूष मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली आहे.