माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत गडनदी च्या पुराचे पाणी घुसल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे.दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.वाढत्या पावसामुळे अनेक शेजारच्या गावांमधील ओढ्यांना पूर आला आहे त्यामुळे गावागावातील रहिवाश्याना अडचणीं चा सामना करावा लागत आहे.
माखजन कासे पुलाच्या दुतर्फा पाणी आल्याने ह्या मार्गांवरील वाहतुक् ठप्प झाली आहे.











