वडद येथील नूतन दत्त मंदिराचा उद्या जीर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा

गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील वडद गायदडवाडी येथील कै. सुरेश गंगाराम धनावडे यांच्या कल्पनेतून स्थापन केलेल्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या बुधवार दिनांक 3 व 4 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त बुधवार दि.3 रोजी सकाळी 8 वाजता श्री दत्त मूर्तीची मिरवणूक, सकाळी 10 वाजता गणेश पूजन, पुन्याहवाचन, होम हवन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, दुपारी 12 वाजता कलशारोहण कार्यक्रम, दुपारी 1 वाजता आरती व तीर्थ प्रसाद, संध्या 7 वा. काजूवाडी यांचा हरिपाठ, गुरुवार दि.4 रोजी सकाळी 8 वाजता मूर्ती अभिषेक, दुपारी 1 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, संध्याकाळी 7 वाजता महिलांचे हळदीकुंकू त्यानंतर महाप्रसाद, रात्री 10 वाजता देणगीदार व मान्यवरांचा सत्कार, त्यानंतर लांजा कुवे मधली उगवतवाडी येथील बहुरंगी नमन पार पडणार आहे.सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भैरी भवानी धनावडे भावकी वडद गायदडवाडी यांनी केले आहे.