एक असं सूर्यग्रहण होणार आहे, जे 6 मिनिटे आणि 23 सेकंदांसाठी जग अंधारात बडवेल. तेव्हा ते जगातील कोणत्या देशांमधून जाईल, भारतात दिसेल का? याविषयीचे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. 2027 मधील या खग्रास सूर्यग्रहणाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कालावधी. हे खग्रास ग्रहण 6 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालेल. या वर्षाला शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण म्हटले जात आहे. याविषयी जाणून घेऊया.












