न्हावेली येथे उपक्रम : तरवा लावणीचे घेतले प्रात्यक्षिक
न्हावेली । प्रतिनिधी : मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात शेतीपासून दूर जात असलेल्या मुलांना पुन्हा शेतीची आवड निर्माण व्हावी तसेच शेतीची कामे कशा पद्धतीने केली जातात याची प्रत्यक्षात माहिती होण्यासाठी येथील व्ही एन नाबर शाळेतील सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांना शेतीकामाचा अनुभव देण्यासाठी तरवा लावणी हा उपक्रम घेण्यात आला . या अंतर्गत मुलांना न्हावेली येथील बंटी नाईक यांच्या शेतात काम करण्याची संधी मिळाली.
सकाळी माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद नाईक यांनी मुलांसाठी न्याहारीची व्यवस्था केली शेतात लावणी कशी करावी याची माहिती मुलांना प्रात्यक्षिकासह देण्यात आली. मुलांनी योग्यरीतीने तरव्याची लावणी केली मीताशी नांत घट्ट करणारा हा अनुभव मुलांनाही खूप भावला. आनंद नाईक व बंटी नाईक यांचे शाळेतर्फे आभार माणणात आले. शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनीही आवर्जून भेट देत प्रशालेच्या शेतीविषयक उपक्रमाचे यावेळी कौतुक केले. यावेळी माजगाव ग्रामपंचायतीचे आबा सावंत उपस्थित होते दरम्यान मळेवाड ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल नाईक हेही मुलांसोबत शेतीच्या कामात सहभागी झाले होते. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, शिक्षिका रसिका वाटवे, सौ. कल्पना परब, प्रशांत देसाई, हर्षद खडपकर, आदी सहभागी झाले होते .












