जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केली परशुराम घाटाची पाहणी

चिपळूण | प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे खेड आणि चिपळूण तालुक्यात हाहाकार मजला असून जगबुडी आणि वशिष्टी नद्यांना पूर आले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. परशुराम घाटात सुद्धा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती.

या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह यांनी केली. व संबंधित यंत्रणेला आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.