दाभोली कोऱ्याचीवाडी येथे बिबट्या कडून दोन पाडसांचा फडशा : गावात भीतीचे वातावरण

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातीत दाभोली कोऱ्याचीवाडी येथील रहिवासी शेतकरी प्रविण बांदवलकर यांच्या म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्या ने फडशा पाडला. यामुळे बांदवलकर यांचे सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भर वस्तीत बिबट्या ची दहशत झाल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांदवलकर यांनी वनविभागाला या बाबत माहिती देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात धाव घेवून पाहणी केली. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने या भागात सिसिटीव्ही बसविले आहेत.