लांजा: भाजपाचे मंडळ कार्यकारिणी सदस्य असलेल्या संकेत घाग यांचा प्रभानवल्ली पंचायत समिती गणातील विविध ठिकाणी ग्रामस्थांतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
सालपे ग्रामपंचायत सदस्य असलेले संकेत घाग हे पंचायत समिती गणामध्ये गेल्या काही वर्षांपासून सक्रियपणे काम करत आहेत. येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील हाती घेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभानवल्ली पंचायत समिती गणामध्ये काही ठिकाणी स्वखर्चाने स्ट्रीट लाईट देखील बसवून दिल्या आहेत.
संकेत घाग यांनी नुकताच प्रभानवल्ली पंचायत समिती गणातील कोचरी गुरववाडी, कोल्हेवाडी मोरेवाडी, पालू येथील दत्त मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी श्री दत्तांचे दर्शन घेतले. तसेच येथील ग्रामस्थांच्या असलेल्या विविध समस्या देखील जाणून घेतल्या आणि या समस्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. संकेत घाग यांच्या कामाची पद्धत येथील ग्रामस्थांना माहीत असल्याने या विविध ठिकाणी भेटीदरम्यान त्यांचा तेथील ग्रामस्थ आणि हितचिंतक यांच्यावतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.













