SMS मध्ये WhatsApp सारख्ये फिचर्स येणार आहे. Airtel-Google मध्ये करार झाल्याने हे शक्य होणार आहे. भारतात डिजिटल चॅटचे एक नवीन युग सुरू होणार आहे, एअरटेल आणि गुगलने RCS मेसेजिंग त्यांच्या नेटवर्कवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा SMS चा एक नवीन आणि सुधारित प्रकार आहे, जो WhatsApp सारखा चॅटिंगचा अनुभव देईल, ज्यात मोठे मेसेज, फोटो शेअरिंग आणि रीड रिसिट्स यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.












