रत्नागिरी : प्रभाग १० मध्ये ११.३० पर्यंत १९.३५ टक्के मतदान

रत्नागिरी : राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये आज (दि. २० डिसेंबर २०२५) सकाळी मतदानास सुरुवात झाली.

प्रभाग १० मध्ये एकूण ४,१४४ मतदार असून त्यामध्ये २,०७९ पुरुष आणि २,०६५ महिला मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या शून्य आहे. सकाळी ९.३० ते ११.३० या पुढील दोन तासांत ८०२ मतदारांनी मतदान केले असून त्यात ४५५ पुरुष आणि ३४७ महिला मतदारांचा समावेश आहे. या वेळेत मतदानाची टक्केवारी १९.३५ टक्के इतकी नोंदवली गेली आहे.