फाटलेल्या रेशन कार्डपासून सुटका; आता ई-रेशन कार्ड बनवा मजबूत PVC कार्डवर

एटीएमसारखे टिकाऊ रेशन कार्ड मिळणार
हार्ड कॉपी खराब होण्याची चिंता कायमची संपणार

फाटलेले किंवा खराब होणारे रेशन कार्ड हाताळताना अनेक नागरिक त्रस्त होत आहेत. अशा नागरिकांसाठी ई-रेशन कार्ड PVC किंवा प्लास्टर कार्ड स्वरूपात बनवण्याचा सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. हे कार्ड एटीएम कार्डप्रमाणे मजबूत आणि टिकाऊ असते. जवळच्या दुकानातून PVC कार्डवर ई-रेशन कार्ड सहज प्रिंट करून घेता येते. त्यामुळे रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्याची मोठी सोय नागरिकांना मिळत आहे.


मुंबई : रेशन कार्ड वारंवार फाटणे किंवा हाताळताना होणारा त्रास यामुळे नागरिक अडचणीत येत असतील, तर आता यावर सोपे आणि कायमस्वरूपी समाधान उपलब्ध झाले आहे. नागरिक आपले ई-रेशन कार्ड PVC किंवा प्लास्टर कार्ड स्वरूपात तयार करू शकतात. हे कार्ड एटीएम कार्डसारख्या मजबूत PVC मटेरियलवर प्रिंट केले जाते.

जवळच्या PVC कार्ड प्रिंटिंग दुकानातून हे कार्ड सहज बनवता येते. एकदा PVC कार्ड तयार झाल्यानंतर रेशन कार्ड फाटण्याची, ओलसर होण्याची किंवा खराब होण्याची चिंता उरत नाही. तसेच हे कार्ड खिशात ठेवायला सोपे असून वापरण्यासही अधिक सोयीचे आहे.

या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून रेशन कार्ड सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे अनेक नागरिक आता पारंपरिक कागदी रेशन कार्डऐवजी PVC ई-रेशन कार्ड वापरण्याकडे वळत आहेत.