खेड (प्रतिनिधी) : दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी आय. आय. टी. बॉम्बे, खेड मार्फत माहे डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या टेकफेस्ट ऑलिंपियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल ३३ विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली असून ही परीक्षा मुंबई येथे होणार आहे.
इयत्ता आठवीमधून कु. शौर्य गावस, कु. हर्षशेठ कोहापरे, कु. मुद्रा भालेकर, कु. स्पंदन धामणे, कु. काव्या कांबळे, कु. युवराज देवघरकर, कु. प्रणव देवकाते, कु. रिचा पंडित, कु. मृण्मयी दामले आणि कु. शेरॉन मुक्कु या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. इयत्ता नववीमधून कु. समर्थ माने, कु. रेवा शहाणे, कु. शौर्य चाळके, कु. साई दळवी, कु. आर्या मोरे, कु. सर्वेश दामले, कु. दिग्विजय धुमाळ, कु. रेवा पाटणकर, कु. स्मित तांबे, कु. कोमल कासार आणि कु. अर्जुन खामकर यांची निवड झाली आहे. तसेच इयत्ता दहावीमधून कु. वेद कालेकर, कु. रुद्र हेलगांवकर, कु. अनिश मनकापूरे, कु. हादी मुकादम, कु. नील बारटक्के, कु. ईशा एस., कु. तीर्था घडीगाणकर, कु. सार्थक घडशी, कु. अवनिश जगताप, कु. कृष्णा कदम, कु. ओम रोहामरे आणि कु. गार्गी आग्रे या विद्यार्थ्यांनी द्वितीय पातळी गाठली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या या यशामुळे खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून आगामी द्वितीय पातळी परीक्षेसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











