चिपळूण Updates : आ. शेखर निकम अधिवेशनात; पत्नी सौ. पूजा निकम यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दिला दिलासा

चिपळूण : चिपळूण शहरातील बाजारपेठेमध्ये १९ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे पाणी शिरले यामुळे व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अधिवेशनाच्या ठिकाणी असणारे आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रशासन तसेच तातडीच्या उपायोजना पुरवण्यासाठी पाठपुरावा करून हालचाली केल्या. अधिवेशनांमधून ते आपल्या मतदारसंघातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार शेखर निकम यांच्या सौभाग्यवती माजी सभापती सौ पूजा निकम या चिपळूण बाजार पेठेमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी चिपळूण बाजारपेठेतील व्यापारी तसेच नागरिक यांच्या भेटीगाठी घेऊन काही नुकसान झाले आहे का किंवा काही उपाययोजना,मदत करता येतील का याबाबत माहिती घेतली.यावेळी त्यांनी चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. यावेळी त्यांच्यासोबत दिशा दाभोळकर,माजी उपनगराध्यक्ष मिलिंद कापडी,माजी नगरसेवक किशोर रेडीज, उदय ओतारी, राकेश चाळके, नितीन ठसाळे, अजिंक्य आंब्रे, कादिर परकार, समीर काझी, मनोज जाधव, सचिन पाटेकर, किसन चिपळूणकर, सचिन साडविलकर, वरून गुडेकर, अल्लाद यादव, अनिकेत ओतारी, विश्वनाथ कांबळे, रुपेश इंगवले, अमित जाधव आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

याबद्दल चिपळूण बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिक यांनी लोकप्रतिनिधींकडून होणारी विचारपूस आणि दिला जाणारा आधार याबद्दल समाधान व्यक्त केले. आणि भविष्यात अशा प्रकारे पाणी भरणार नाही यासाठी आमदार महोदय यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी काही उपाय करता येतील का अशी मागणी माजी सभापती सौ पूजा निकम यांच्याकडे केली. यावेळी सौ निकम यांनी याबाबत आपण आमदार शेखर निकम यांच्याशी बोलून यावर अधिकाधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे देखील आश्वासन दिले.